Eklavya Krida Sankul Foundation Day
Participants
Participants
जळगांव येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मू. जे. महाविद्यालय संचालित एकलव्य क्रीडा संकुल मा. श्री. नंदकुमार बेंडाळे अध्यक्ष, के. सी. ई. सोसायटी, यांचे संकल्पनेतून १४ नोव्हेंबर २००४ रोजी प्रत्यक्ष सुरु झाले. मा. दादांच्या मार्गदर्शनाने प्रा. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम सुरु केले. सुरुवातीस लहान मुलांकरिता प्ले सेंटर, बॅडमिंटनचे अद्ययावत दोन वुडन कोर्ट, टेबल टेनिस हॉल, स्केटिंग रिंक, जिम्नॅशियम इत्यादी क्रीडा सुविधा होत्या. पाहता पाहता एकलव्य क्रीडा संकुलाने १५ वर्षे पूर्ण केली या कालावधीत विविध खेळांचे राष्ट्रीय, राज्यस्तरीय खेळाडू येथे तयार झाले इतकेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा येथील खेळाडूंनी नावलौकिक मिळविले आहे. आता एकलव्य क्रीडा संकुल येथे पाच बॅडमिंटन वुडन कोर्ट, आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव, जिम्नॅस्टिक्स हॉल, १० ,मीटर शूटिंग रेंज, टर्फ विकेट, क्रिकेट नेट प्रॅक्टिस इत्यादी करिता अद्ययावत क्रीडा सुविधा उपलब्ध आहेत जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी या सुविधांचा लाभ घेत आहेत.
एकलव्य क्रीडा संकुलाचा १५ वा वर्धापन दिन विद्यार्थी, खेळाडू, पालक यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी विविध खेळाचे राष्ट्रीय, राज्यस्तरीय खेळाडूंना भेटवस्तू देऊन प्रा. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर सर, प्रा. डॉ. रणजीत पाटील, श्री. सचिन महाजन, प्रा. निलेश जोशी, प्रा. नितीन चौधरी, प्रा. प्रविण कोल्हे, प्रा. पंकज पाटील, श्री. निलेश बाविस्कर, कु. कोमल पाटील, सौ. संगिता चौधरी या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच केक कापण्यात आला खेळाडूंना खाऊ वाटण्यात आला. याकरिता श्री. राजेंद्र नारखेडे, श्री. निलेश खडके, श्री. केशव नेहेते, श्री. अंकुश चौधरी, सौ. चंद्रलेखा जगताप, श्री. सुकदेव सोनवणे, श्री. गोपाळ घुगे, श्री. शंकर ठाकूर, श्री. वसंत सोनवणे इ. यांनी परिश्रम घेतले.