Khandesh College Education Society's
Eklavya Krida Sankul
"Accredited by Sports Authority of India Under The Khelo India Talent Identification
and Development Programme for Swimming, Badminton & Rifle Shooting"

Achievements

एकलव्य जिम्नॅस्टिक्स खेळाडू भूषणची भारतीय जिम्नॅस्टिक्स संघात निवड
प्रा. निलेश जोशी यांना मार्गदर्शक म्हणून संधी
  •    
दिनांक १४ सप्टेंबर २०१८ ते १६ सप्टेंबर २०१८ दरम्यान उलानबतार, मंगोलिया येथे
होणाऱ्या एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स आशियाई चषक स्पर्धेसाठी खान्देशातून प्रथमच एकलव्य जिम्नॅस्टिक्स
आकॅडेमीचा विद्यार्थी खेळाडू भूषण देशमुख या खेळाडूची भारतीय संघात निवड झाली. त्याच प्रमाणे
प्रा. निलेश जोशी यांना भारतीय जिम्नॅस्टिक्स संघाच्या प्रशिक्षक पदाची संधी प्राप्त झाली. भारतीय
जिम्नॅस्टिक्स संघटना व तामिळनाडू जिम्नॅस्टिक्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने १२ ऑगस्ट २०१८
रोजी या स्पर्धेसाठी निवड चाचणी सेंटर ऑफ स्पोर्ट्स सायन्स, श्री. रामचंद्र मेडिकल युनिव्हर्सिटी,
चेन्नई, येथे पार पडली. या निवड चाचणीसाठी संपूर्ण भारतामधून गुजरात, मणिपूर, गोवा कर्नाटक,
तामिळनाडू, पश्चिम बंगाल, सेनादल व महाराष्ट्राच्या एकूण ७० खेळाडूंनी विविध वयोगटात सहभाग
नोंदवला. यापैकी ज्युनिअर - २ म्हणजेच १७ वर्षांखालील वयोगटात भूषणची पुरुष एकेरी या
प्रकारात निवड झाली. तो गेल्या चार वर्षांपासून एकलव्य जिम्नॅस्टिक्स आकॅडेमी येथे दैनंदिन सराव
करत असून आतापर्यंत त्याने विविध राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदके मिळवली आहेत.
मागच्याच वर्षी त्याची कलकत्ता, पश्चिम बंगाल येथे झालेल्या अखिल भारतीय प्रशिक्षण शिबिरासाठी
निवड झाली होती.

प्रा. निलेश जोशी यांना या स्पर्धेच्या निमित्ताने भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाची संधी प्राप्त
झाली आहे. एकलव्य जिम्नॅस्टिक्स आकॅडेमीद्वारे मागील चार वर्षांपासून प्रा. निलेश जोशी यांनी
आजपर्यंत एकूण १६ राष्ट्रीय खेळाडूंपैकी ०५ पदकप्राप्त खेळाडू आणि २८ राज्यस्तरीय खेळाडूंपैकी
१४ पदक प्राप्त खेळाडू घडविले आहेत. त्याच प्रमाणे त्यांनी जुलै २०१८ मध्ये अल्माटी, कझाखस्तान
येथे झालेले एरोबिक्स जिम्नॅस्टिक्सचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक शिबीर विशेष श्रेणीत प्राप्त करत
यशस्वीपणे पूर्ण केले.
याप्रसंगी प्रा. निलेश जोशी व खेळाडू भूषण देशमुख यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. नंदकुमार बेंडाळे,
मू. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, मू. जे. महाविद्यालयाचे क्रीडा
संचालक तसेच एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, जिम्नॅस्टिक्स
प्रशिक्षक प्रा. प्रविण कोल्हे तसेच प्रा. नितीन चौधरी, डॉ. रणजीत पाटील, श्री. सचिन महाजन तसेच
पालक व खेळाडू यांनी त्यांचे अभिनंदन केले.
सी.बी.एस.ई. राष्ट्रीय एरोबिक्स स्पर्धेत एकलव्य जिम्नॅस्टिक्स आकॅडेमीच्या खेळाडूंना
तीन सुवर्ण, दोन रौप्य व एक कांस्य पदक पटकावले
दिनांक २१ नोव्हेंबर २०१८ ते २४ नोव्हेंबर २०१८ दरम्यान साल्वान पब्लिक स्कूल,
गुरूग्राम, हरियाणा येथे झालेल्या सी.बी.एस.ई. च्या राष्ट्रीय एरोबिक्स स्पर्धेसाठी एकलव्य क्रीडा
संकुलातील एकलव्य जिम्नॅस्टिक्स आकॅडेमीच्या सहा खेळाडूंची क्लस्टर नऊ या संघात निवड झाली. या
स्पर्धेमध्ये एकलव्य जिम्नॅस्टिक्स अकॅडेमीचा सहा सदस्यीय संघ ११ वर्षे वयोगट व १४ वर्षे वयोगट या
दोन गटात सहभागी झाला. स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातून एकूण ७२ शाळांमधील ६३२ खेळाडूंनी सहभाग नोंदिवला.
या संघातील सर्व खेळाडूंनी उत्कृष्ठ प्रदर्शन करत स्पर्धेत आपली छाप सोडली व तीन सुवर्ण,
दोन रौप्य व एक कांस्य पदक अश्या एकूण सहा पदकांची कमाई केली.
या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक प्रा. निलेश जोशी व राज्यस्तरीय
जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक प्रा. प्रविण कोल्हे यांचे मार्गदर्शन मिळाले. या स्पर्धेसाठी एकलव्य जिम्नॅस्टिक्स
आकॅडेमीचे मुख्य प्रशिक्षक प्रा. निलेश जोशी यांनी पंच प्रमुखाची भूमिका बजावली. खेळाडूंच्या या
यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. नंदकुमार बेंडाळे, मू. जे. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक तसेच
एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी प्रा.डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे
क्रीडा शिक्षक तसेच एकलव्य स्केटिंग आकॅडेमीचे मुख्य प्रशिक्षक डॉ. रणजित पाटील, जिम प्रशिक्षक
श्री. सचिन महाजन, के.सी.ई. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. नितीन चौधरी तसेच सर्व खेळाडूंनी त्यांचे अभिनंदन केले.

स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे :
१४ वर्षे वयोगट (मुले)
  • यशराज देशमुख
    सुवर्ण पदक (३२.०२ गुण)
१४ वर्षे वयोगट (मुली)
  • कु. श्रावणी कदम
    सुवर्ण पदक (३१.९७ गुण)
  • कु. श्रेया पाटील
    कांस्य पदक (२७.४० गुण)
११ वर्षे वयोगट (मुले)
  • उत्कर्ष सोनार
    रौप्य पदक (२७.३० गुण)
११ वर्षे वयोगट (मुली)
  • कु. अनुष्का चौधरी
    सुवर्ण पदक (२७.९३ गुण)
  • कु. साची इंगळे
    रौप्य पदक (२७.८७ गुण)
राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत एकलव्य क्रीडा संकुलाच्या जिम्नॅस्टिक्स संघास सांघिक उपविजेतेपद
०१ सुवर्ण, ०६ रौप्य व ०८ कांस्य पदांचा समावेश
  •    
के.सी.ई. सोसायटीच्या एकलव्य क्रीडा संकुलातील एकलव्य जिम्नॅस्टिक्स आकॅडेमीमध्ये सराव
करणाऱ्या १५ खेळाडूंची मडगांव, गोवा येथे १२ जून ते १५ जून २०१८ दरम्यान होणाऱ्या एरोबिक्स
जिम्नॅस्टिक्स राष्ट्रीय स्पर्धेसाठी आवड झाली होती. गोवा जिम्नॅस्टिक्स संघटना व अनॅक फिटयुथ यांच्या
संयुक्त विद्यमाने सदर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत एकलव्य जिम्नॅस्टिक्स आकॅडेमीचा संघ नॅशनल
डेव्हलपमेंट, सब ज्युनिअर व ज्युनिअर या तीन गटांत सहभागी झाला. या संघामध्ये खेळाडूंची पदकविजेती कामगिरी पुढीलप्रमाणे
नॅशनल डेव्हलपमेंट :
उत्कर्ष सोनार (पुरुष एकेरी) - रौप्य
साची इंगळे व उत्कर्ष सोनार (मिश्र दुहेरी) - रौप्य पदक
अनुष्का चौधरी, साची इंगळे व उत्कर्ष सोनार (मिश्र तिहेरी) - रौप्य
सब ज्युनिअर :
वेदोसी वाणी (महिला एकेरी) - कांस्य पदक
पाणिनी देव व रागिणी चोपडे (मिश्र दुहेरी) - कांस्य पदक
श्रावणी कदम, रागिणी चोपडे व मेहेक चौधरी (मिश्री तिहेरी) - कांस्य पदक
ज्युनिअर :
भूषण देशमुख (पुरुष एकेरी) - सुवर्ण पदक
अनुष्का जगताप व भूषण देशमुख (मिश्र दुहेरी) - कांस्य पदक
मार्गदर्शक : प्रा. प्रविण कोल्हे (एकलव्य जिम्नॅस्टिक्स आकॅडेमी सहाय्यक प्रशिक्षक)
पंच व मार्गदर्शक : प्रा. निलेश जोशी (एकलव्य जिम्नॅस्टिक्स आकॅडेमी मुख्य प्रशिक्षक)

एकलव्य क्रीडा संकुल येथे गेटिंग फिट फॉर समर या सेमिनारला पालक खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद
  •    
एकलव्य क्रीडा संकुल व एकलव्य जिम्नॅस्टिक्स अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०९
मार्च २०१९ रोजी एकलव्य क्रीडा संकुलातील विविध खेळांचे प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडू, पालक व
मार्गदर्शक यांच्यासाठी स्पोर्ट्स स्पेसिफिक लेक्चर्स या उपक्रमाअंतर्गत उन्हाळ्यामध्ये खेळाडूंनी
घ्यावयाची काळजी, त्यांचा आहार व प्रशिक्षण या विषयाला अनुसरून “गेटिंग फिट फॉर समर” या
सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी व्यासपीठावर मू. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, क्रीडा संचालक
डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर व प्रमुख वक्ते प्रा. निलेश जोशी उपस्थित होते. प्राचार्यानी आपल्या भाषणात
जीवनातील खेळाचे महत्व सांगितले तर डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांनी खेळाडूंसाठीच्या विविध
योजनांची माहिती दिली. या सेमिनारसाठी जलतरण, बॅडमिंटन, जिम्नॅस्टिक्स, स्केटिंग, क्रिकेट,
धनुर्विद्या, रायफल शूटिंग, फुटबॉल अशा विविध खेळांचे ६० खेळाडू, १४० पालक व ३० मार्गदर्शक
असे एकूण २३० प्रेक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. निलेश जोशी यांनी या उपक्रमामागची शास्त्रोक्त भूमिका अधोरेखित
करतांना उन्हाळा, खेळ, आहार व प्रशिक्षण यांची सुरेख सांगड घालत दैनंदिन जीवनात उपयोजू
शकणाऱ्या बारीक बारीक मुद्यांसह उपस्थितांना बोलके करत पाण्याचे जीवनातील महत्व विषद केले.
टीव्ही वा इतर प्रसारमाध्यमांद्वारे प्रक्षेपित होणाऱ्या विविध जाहिरातींचे अंधानुकरण न करता, खेळ व
परिस्थितीनुसार हायड्रेशन ड्रिंक्सचा वापर कसा करता येईल हे देखील सांगितले. शरीरातील पाण्याची
पातळी योग्य राखण्यासाठी पाण्याव्यतिरिक्त उपलब्ध असलेल्या पर्यायांचे महत्व पटवून देतांना
Eat Your Water हि संकल्पना मांडली. त्यांनी उपस्थितांना
Eat Smarter + Train Harder = Perform Better हा मूलमंत्र दिला.
शेवटी त्यांनी खेळाडूचे अपेक्षित कार्यमान साधण्यासाठी आवश्यक असलेल्या क्रीडा
मानसशास्त्र, क्रीडा पोषण, क्रीडा वैद्यकशास्त्र, क्रीडा प्रशिक्षण, मापन व मूल्यमापन अशा विविध
पैलूंचा उहापोह केला. तसेच येणाऱ्या वर्षात या सर्व बाबींवर काम करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष
प्रज्ञावंत श्री. नंदकुमारजी बेंडाळे यांच्या संकल्पनेवर आधारित एकलव्य स्पोर्ट्स सोल्युशन्स या
शास्त्रोक्त शाखेबद्दल उपस्थितांना माहिती दिली
एकलव्य क्रीडा संकुल जलतरण तलावावरील स्पर्धेत
राष्ट्रीय व राज्य स्तरीय खेळाडूंचा सहभाग
एकलव्य क्रीडा संकुलातील जलतरण तलावावर ०८ महिन्यांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर
आज दिनांक ०७ जानेवारी २०२१ रोजी राष्ट्रीय व राज्य स्तरीय खेळाडूंची ५० मीटर फ्री
स्टाईल व १०० मीटर फ्री स्टाईल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत एकूण
४० मुले व २२ मुलींनी सहभाग नोंदवला. सदर स्पर्धा हि शासनाच्या covid-19
संदर्भातील सर्व नियमांचे काटेकोर पालन करून पार पाडण्यात आली.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे :
५० मीटर फ्री स्टाईल मुले
सागर कैलास सोनवणे (प्रथम)
सागर संजीव टेकावडे (द्वितीय)
विशाल संजीव टेकावडे (तृतीय)
५० मीटर फ्री स्टाईल मुली
आकांक्षा गोरख म्हेत्रे (प्रथम)
निधी सत्यजित पाटील (द्वितीय)
फाल्गुनी रवींद्र सपकाळे (तृतीय)
१०० मीटर फ्री स्टाईल मुले
शुभम युवराज काळे (प्रथम)
कार्तिक लीलाधर काळे (द्वितीय)
महावीरसिंग सत्यजित पाटील (तृतीय)
१०० मीटर फ्री स्टाईल मुली
आकांक्षा गोरख म्हेत्रे (प्रथम)
निधी सत्यजित पाटील (द्वितीय)
प्रचेता अमित चौधरी (तृतीय)

सदर स्पर्धेसाठी श्री. चेतन चौधरी, श्री. नवीन पाटील, श्री. चंद्रकांत मिस्त्री, कु. कोमल
पाटील, कु. रीना पाटील यांनी पंच म्हणून कार्य केले. तलावावरील मुख्य एन आय एस कोच
श्री. अखिलेश यादव व भूषण तायडे यांनी स्पर्धेचा निकाल तसेच आयोजनाचे कार्य केले.
सदर स्पर्धा ह्या प्रा. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. विजेत्या
खेळाडूंचे के. सी. ई. सोसायचे संचालक श्री. डी. टी. पाटील यांनी कौतुक केले. स्पर्धेच्या
यशस्वितेकरिता श्री. नितीन चौधरी, श्री. निलेश खडके, श्री. राजेंद्र नारखेडे, सौ. चंद्रलेखा
जगताप तसेच संपूर्ण एकलव्य क्रीडा संकुलातील कर्मचारीवृंदाने कार्य केले.
विभागीय स्तरीय रोलबॉल स्पर्धा
  •    
  •    
19 डिसेंबर 2021 रविवार रोजी सकाळी 10 वाजता भगीरथ हायस्कुल येथे मेजर स्पोर्ट्स क्लब जळगाव जिल्हा रोलबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय स्तरीय रोल बॉल 11 वर्षे मूले व मुली तसेच 14 वर्षे मुले व मुली यांच्यात स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यामध्ये एकलव्य स्केटिंग ऍकॅडमीच्या खेळाडूंचा संघास कास्यपदक मिळाले *विजयी संघाला मेडल व ट्रॉफी देण्यात आले व सर्व खेळाडू ना प्रशस्ती पत्र देण्यात आले विजयी संघाची निवड यवतमाळ येथे होण्याऱ्या 15 व्या राज्यस्तरीय रोलबॉल स्पर्धे साठी निवड करण्यात आली.
ह्या मध्ये एकलव्य क्रीडा संकुलातील स्केटिंग अकॅडमीच्या सात खेळाडूंची निवड करण्यात आली अथर्व खांडरे, हर्ष वाघमारे, तनिष पाटील, स्मित चोरडिया, जिग्नेश बोरसे, भूषण जाधव, देवांश चौधरी या सर्व खेळाडूंचे अभिनंदन के सी ई सोसायटीचे अध्यक्ष श्री नंदकुमार बेंडाळे, प्रशासकीय अधिकारी श्री शशिकांत वडोदकर, मु जे महाविद्यालय चे प्राचार्य डॉ स ना भारंबे . श्री डी टी पाटील समन्वयक एकलव्य क्रीडा संकुल प्रा डॉ श्रीकृष्ण बेलोरकर प्रशासकीय अधिकारी यांनी अभिनंदन केले या खेळाडूंना प्रा डॉ रणजीत पाटील स्केटिंग मुख्य प्रशिक्षक गौरव शिरसाळा सहाय्यक प्रशिक्षक रीना पाटील सहाय्यक प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.
क्रॉस-कंट्री स्पर्धा - 2022
  •    
  •    
  •    
  •    
  •    
  •    
  •    
  •    
19 डिसेंबर 2021 रविवार रोजी सकाळी 10

Scroll To Top