Khandesh College Education Society's
Eklavya Krida Sankul
"Accredited by Sports Authority of India Under The Khelo India Talent Identification
and Development Programme for Swimming, Badminton & Rifle Shooting"
Dr. G. D. Bendale Mem. Badminton Competition 2019
  •     Participants
  •     Honorary Guest
  •     मार्गदर्शन
  •    
  •     Participants
के.सी.ई. सोसायटी संचालित एकलव्य क्रीडा संकुल येथे अण्णासाहेब डॉ. जी. डी. बेंडाळे स्मृती (उत्तर महाराष्ट्र) राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन
के.सी.ई. सोसायटी संचालित मूळजी जेठा महाविद्यालयाचे एकलव्य क्रीडा संकुल येथे अण्णासाहेब डॉ. जी.डी. बेंडाळे स्मृती (उत्तर महाराष्ट्र) राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. स्पर्धेला जळगांव जिल्ह्यातील शाळा तसेच महाविद्यालयातील २३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेत प्रथम, व्दितीय आणि तृतीय क्रमांकास अनुक्रमे सुवर्ण (Gold) रजत (Silver) आणि कांस्य (Bronze) पदक तसेच स्पर्धा सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच सर्वाधिक विजयी गटाला सांघिक विजेतेपद म्हणून ट्रॉफी देण्यात आली. या स्पर्धा एकलव्य क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन कोर्टवर घेण्यात आल्या.

सदर स्पर्धा या U-10, U-12, U-14, U-17 आणि खुल्या गटांमध्ये झाल्या. या कार्यक्रमा करिता प्रमुख पाहुणे म्हणून श्री. शशिकांत वाडोदकर (अध्यक्ष, अण्णासाहेब डॉ. जी. डी. बेंडाळे प्रतिष्ठान) श्री. डी. टी. पाटील (संचालक, के.सी. ई. सोसायटी) श्री. सुदीप साठे (मुख्याध्यापक, ओरीओन स्टेट बोर्ड), श्री. के.सी. सुथार (संचालक एकलव्य क्रीडा संकुल), आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेकरिता मूळजी जेठा महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. डॉ. श्रीकृष्ण एच.बेलोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. डॉ. रणजीत पाटील, प्रा. निलेश जोशी, प्रा. प्रविण कोल्हे, प्रा. पंकज पाटील, श्री. धर्मेश चतुर्वेदी, श्री. केशव नेहेते यांनी स्पर्धा पार पाडल्या. स्पर्धेत पंच अधिकारी म्हणून श्री शेखर सोनवणे, श्री. गजानन खराद यांनी काम पहिले.
Dr. G. D. Bendale Mem. Football Competition 2019
  •     Participants
  •     Participants
  •     Participants
  •     Participants
एकलव्य क्रीडा संकुल येथे एकलव्य फुटबॉल अकॅडमीतर्फे अण्णासाहेब डॉ. जी. डी. बेंडाळे स्मृती शालेय स्तर फूटबॉल स्पर्धा आयोजित
एकलव्य क्रीडा संकुल येथे एकलव्य फूटबॉल अकॅडमीतर्फे अण्णासाहेब डॉ. जी. डी. बेंडाळे स्मृती शालेय स्तर फूटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेत विजेत्या संघास फूटबॉल चषक तर उत्कृष्ठ खेळाडूस अनुक्रमे सुवर्ण (Gold), रौप्य (Silver) व कांस्य (Bronze) पदक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत एकूण ०६ शालेय संघांनी सहभाग नोंदवला. यात एकलव्य फूटबॉल अकॅडमीचे खेळाडू सरस ठरले. स्पर्धेत पंच म्हणून श्री. कपिल मिश्रा तसेच के.सी.ई. शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रा. पंकज पाटील यांनी काम बघितले. सदर स्पर्धा ह्या एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. श्रीकृष्ण एच. बेलोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या.
Dr. G. D. Bendale Mem. Rifle & Pistol Shooting Competition 2019
  •    
  •     Participants
के.सी.ई. सोसायटी संचालित, एकलव्य क्रीडा संकुल येथे अण्णासाहेब डॉ. जी. डी. बेंडाळे स्मृती रायफल व पिस्तोल शूटिंग स्पर्धेचे आयोजन
के. सी. ई. सोसायटी संचलीत मूळजी जेठा महाविद्यालयाचे एकलव्य क्रीडा संकुल येथे दिनांक १७ ऑगस्ट २०१९ ते १८ ऑगस्ट २०१९ दरम्यान अण्णासाहेब डॉ. जी. डी. बेंडाळे स्मृती जिल्हास्तरीय रायफल व पिस्तोल शूटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धा ह्या शालेय, महाविद्यालयीन तसेच खुल्या गटांतील खेळाडूंसाठी झाल्या सदर स्पर्धेत विजेत्या खेळाडूंना रोख बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सहभागी खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र व टी-शर्ट देण्यात आले. स्पर्धेत राष्ट्रीय खेळाडू व एकलव्य शूटिंग अकॅडमीचे प्रशिक्षक श्री. किरण पाटील व सागर सोनवणे यांनी पंच म्हणून काम बघितले. या प्रसंगी आंतरराष्ट्रीय शूटिंग फेडरेशन मान्यताप्राप्त प्रशिक्षक श्री. दीक्षांत जाधव उपस्थित होते. सदर स्पर्धा ह्या मूळजी जेठा महाविद्यालयाचे क्रीडा संचालक तसेच एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. श्रीकृष्ण एच. बेलोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या.
Dr. G. D. Bendale Mem. Swimming Competition 2019
  •    
  •     Participants
  •     Participants
  •     Participants
  •     Participants
  •     Participants
  •     Participants
  •     Participants
  •     Participants
  •     Participants
  •     Participants
Dr. G. D. Bendale Mem. Swimming Competition 2021
  •     Participants
  •     Participants
एकलव्य क्रीडा संकुल जलतरण तलावावरील स्पर्धेत राष्ट्रीय राज्य स्तरीय खेळाडूंचा सहभाग एकलव्य क्रीडा संकुलातील जलतरण तलावावर ०८ महिन्यांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर आज दिनांक ०७ जानेवारी २०२१ रोजी राष्ट्रीय व राज्य स्तरीय खेळाडूंची ५० मीटर फ्री स्टाईल व १०० मीटर फ्री स्टाईल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत एकूण ४० मुले व २२ मुलींनी सहभाग नोंदवला. सदर स्पर्धा हि शासनाच्या covid-19 संदर्भातील सर्व नियमांचे काटेकोर पालन करून पार पाडण्यात आली. स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे : ५० मीटर फ्री स्टाईल मुले सागर कैलास सोनवणे (प्रथम) सागर संजीव टेकावडे (द्वितीय) विशाल संजीव टेकावडे (तृतीय) ५० मीटर फ्री स्टाईल मुली आकांक्षा गोरख म्हेत्रे (प्रथम) निधी सत्यजित पाटील (द्वितीय) फाल्गुनी रवींद्र सपकाळे (तृतीय) १०० मीटर फ्री स्टाईल मुले शुभम युवराज काळे (प्रथम) कार्तिक लीलाधर काळे (द्वितीय) महावीरसिंग सत्यजित पाटील (तृतीय) १०० मीटर फ्री स्टाईल मुली आकांक्षा गोरख म्हेत्रे (प्रथम) निधी सत्यजित पाटील (द्वितीय) प्रचेता अमित चौधरी (तृतीय) सदर स्पर्धेसाठी श्री. चेतन चौधरी, श्री. नवीन पाटील, श्री. चंद्रकांत मिस्त्री, कु. कोमल पाटील, कु. रीना पाटील यांनी पंच म्हणून कार्य केले. तलावावरील मुख्य एन आय एस कोच श्री. अखिलेश यादव व भूषण तायडे यांनी स्पर्धेचा निकाल तसेच आयोजनाचे कार्य केले. सदर स्पर्धा ह्या प्रा. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. विजेत्या खेळाडूंचे के. सी. ई. सोसायचे संचालक श्री. डी. टी. पाटील यांनी कौतुक केले. स्पर्धेच्या यशस्वितेकरिता श्री. नितीन चौधरी, श्री. निलेश खडके, श्री. राजेंद्र नारखेडे, सौ. चंद्रलेखा जगताप तसेच संपूर्ण एकलव्य क्रीडा संकुलातील कर्मचारीवृंदाने कार्य केले.

Scroll To Top